Breaking
ब्रेकिंग

मुंबई येथे अनुभूती महागौरव संमेलन संपन्न !!

अनुभूती महागौरव संमेलन"

0 0 3 4 8 4

मुंबई येथे अनुभूती महागौरव संमेलन संपन्न !!

दैनिक युवक आधार

 

टि.एम.जी क्रीयेशन्स व इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने “अनुभूती महागौरव संमेलन” नुकतेच, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई येथे मोठ्या ‘उत्साहात’ संपन्न झाला. सदर कार्यक्रमाची ‘संकल्पना’ एन.डी.खान यांची होती. तर सौ. सलमा खान सदर “महागौरव सोहळ्याच्या आयोजक” होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कर्नल रवींद्र त्रिपाठी, जेष्ठ अभिनेत्री नयना आपटे, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.शुभदा नील, जेष्ठ साहित्यिक डॉ. सादिका नवाब,सहर, बाॅलीवूड आणि टाॅलीवूड अभिनेते अभंष कुमार, चित्रपट कलाकार अली शेख आणि जेष्ठ लेखक राम मेस्त्री इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात ‘अतुलनीय’ कार्य करणाऱ्या सेवाव्रतींना “राष्ट्रीय टी.एम.जी सुवर्ण रत्न एक्सलन्स पुरस्कार व राज्यस्तरीय अनुभूती जनसेवा सन्मान” पुरस्काराने, तुतारीच्या जल्लोषाने प्रमुख अतिथींच्या ‘शुभ हस्ते’ सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे ‘प्रास्ताविक’ संस्थापक एन.डी.खान यांनी केले. तर कार्यक्रमाचे ‘उत्कृष्ट’ निवेदन गीताश्री नाईक व योगिनी दुराफे यांनी केले.

सदरहू महागौरव संमेलनाचे औचित्य साधून, शब्दश्री विलास देवळेकर लिखित, प्रसिद्ध शाहीर दत्ताराम म्हात्रे यांनी “अनुभूती महागौरव संमेलन” याच्यावर आधारित ‘पोवाडा’ सादर केला. ‌जागतिक किर्तीचे जादूगार वैभव कुमार व रामदास पारकर यांच्या “म्युझिक -मस्ती- मॅजिक” या कार्यक्रमाने उपस्थित रसिक प्रेक्षक अचंबित झाले. तर एम.वाय.हुसेन यांच्या कोरिओग्राफीच्या मार्गदर्शनाखाली “राॅयल डान्स अकॅडमी” च्या विद्यार्थ्यांनी पेश केलेल्या, नृत्याने उपस्थित भारावून गेले. तसेच पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान, डॉ.विजय मोरे, स्वप्निला रोकडे, रामदास पारकर आणि विद्या डोंबे यांनी सादर केलेल्या मराठी व हिंदी गीतांना उपस्थितांनी ‘दाद’ दिली.

सदरहू संमेलनात, प्रमुख अतिथींना आपले मनोगत व्यक्त करताना सदर “महागौरव संमेलनाचे कौतुक” केले. अशा प्रकारच्या पुरस्कार सोहळ्यामुळे ‘सामाजिक भान’ जपले जात असल्याची, त्यांनी ‘भावना’ व्यक्त केल्या. याप्रसंगी डॉ. शिवदास कांबळे यांनी प्रमुख आयोजक सौ.सलमा खान व एन.डी.खान यांच्यावर केलेली “काव्यरचना” सादर केली. तसेच जेष्ठ साहित्यिक अक्षरश्री विलास देवळेकर यांनी एन.डी.खान व सौ.सलमा खान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुंदर व सुबक अशी “कवितामय फोटो फ्रेम” त्यांना भेट दिली.

सदरहू महागौरव संमेलन यशस्वी करण्यासाठी, डॉ. विजय मोरे, राजकुमार ताकमोगे, डॉ. शैलेंद्र पवार, अक्षरश्री विलास देवळेकर, सौ. मीना ताकमोगे, मोहन जाधव, दिपक कदम, संदीप पाटील आणि प्रतिभा किर्तीकर्वे यांनी ‘विशेष परिश्रम’ घेतलेत.

अक्षरश्री विलास देवळेकर यांनी “अनुभूती महागौरव संमेलन” च्या अद्यक्षराने केलेली काव्यरचने चा फ्लेक्सने सर्वांचे ‘लक्ष वेधून’ घेत होते. अनेकांनी सदरहू फ्लेक्स सोबत ‘फोटोही’ काढलेत. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन ‘शिस्तबद्ध’ पद्धतीने करण्यात आले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

युवक आधार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 4 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे