Breaking
ब्रेकिंग

गो म वेदक विद्यामंदिर तळाच्या विद्यार्थ्यानी घेतली भारतीय जवानाची प्रेरणा

0 0 3 4 8 4

गो म वेदक विद्यामंदिर तळाच्या विद्यार्थ्यानी घेतली भारतीय जवानाची प्रेरणा

 

दैनिक युवक आधार

तळा : तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो म वेदक विद्यामंदिर तळा येथे नुकताच विद्यार्थी प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तळा तालुक्यातील गिरणा या छोट्या गावातील श्री गणेश प्रकाश कीर्तने गरीब परिस्थीवर मात करून भारतीय लष्करी सेवेमध्ये देशसेवा करीत आहेत त्यांची प्रेरणा विद्यार्थ्याना मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री रोहीत भागवत यांनी सांगितले. सुरुवातीला भारतीय जवान श्री गणेश कीर्तने यांना विद्यार्थ्यानी उभे राहून सलाम केला. यावेळी भारतीय जवान श्री गणेश कीर्तने यांनी त्यांचा सुरुवातीपासूनचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. आपण नेहमी मोठे स्वप्न पहा, मी याच शाळेचा विद्यार्थी असून एकेकाळी तुमच्यासारखाच खाली बसून भारतीय लष्करी सेवेत देशसेवा करण्याचे स्वप्न पाहत होतो, मेहनत घेतली, खूप अभ्यास केला, परिस्थितीचा कधी बाऊ न करता सराव केला त्याचे फळ आज मिळाले आहे त्यामुळे मित्रांनो मेहनत करीत रहा यश नक्की मिळेल असे आवाहन त्यांनी केले. कश्मीरमध्ये असताना अतिरेक्यांशी झालेली लढाई विद्यार्थ्यांना कथन करताना सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. अथक मेहनत, काहीतरी करण्याची जिद्द, मोठे स्वप्न, परिस्थितीवर केलेली मात, यातूनच हा जवान तयार झाला. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून अधिक माहिती मिळवली. या कार्यक्रमात माननीय मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे यांनी शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन श्री गणेश कीर्तने यांचा गौरव केला. या कार्यक्रमाला उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक पाटील एन सी, पत्रकार श्री डी टी आंबेगावे, माध्यमिक विभागाचे दौडमनी सर बागुल सर, श्री भोईर सर, सौ मुंडे मॅडम, व वडके मॅडम उपस्थित होते. प्रास्ताविक श्री भागवत सर यांनी केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अनोखा प्रेरणादायी ठरला असून श्री गणेश कीर्तने यांच्यासोबत विद्यार्थ्याना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. यावेळी गो म वेदक विद्यामंदिर तळाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

युवक आधार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 4 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे