प्रा.डॉ.जयपाल पाटील यांचे आपत्ती सुरक्षा वरील ६३६ वे होणार व्याख्यान !!
प्रा.डॉ.जयपाल पाटील यांचे आपत्ती सुरक्षा वरील ६३६ वे होणार व्याख्यान !!

प्रा.डॉ.जयपाल पाटील यांचे आपत्ती सुरक्षा वरील ६३६ वे होणार व्याख्यान !!
दैनिक युवक आधार
जिल्हा प्रतिनिधी प्रमुख/ एम.डी.भोईर
अलिबाग :-कुरुळ काॅलनी मधील राष्ट्रीय केमिकल आणी फर्टीलायझर च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत दोन सत्रात इयत्ता ५ वी ते १२ वीचे १००० विदयार्थी व शिक्षक आणी कर्मचारी यांना जागतिक पातळीवरील आपत्तीव्यवस्थापन तज्ञ प्रा.डॉ.जयपाल पाटील हे त्याचे ६३६ वे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता पहिले सत्र १०.३० ला दुसरे सत्र होणार असून यामधे प्रथम योगाभ्यास, आपले घरातील गॅस सिलेंडर, विजेची उपकरणे,साप आणी विंचू दंश, अपघात झाल्यास १०८ रुग्णवाहिका, गावातील महिलेस बाळंतपणात १०२ रूग्ण वाहिकेचा वापर, मुली,महिला सुरक्षिततेबाबत महाराष्ट्र पोलीस ११२ क्रमांकाचा वापर, महाराष्ट्र शासनाचा आपत्तीव्यवस्थापन च्या कायद्याची माहीती ,गावात अगर घरात आग लागली तर विझवण्याचे प्रात्यक्षिक, शेवटी मृत्यु झाल्यावर बांबुची तिरडी बांधण्याचे प्रात्यक्षिक यावेळेस दाखविण्यात रायगड चा युवक फाउंडेशन चे तज्ज्ञांकडून दिले जाणार आहे.या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल यांनी दिनांक १८/१०/२०२५ रोजी रायगड भूषण, अदिवासीसेवक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त डॉ.जयपाल पाटील यांना दिले आहे.



