वक्फच्या काही भूखंडावर भूमाफियांनी बेकायदेशीर कब्जा केला असून त्यांच्या कारवाई करण्याची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांची मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे मागणी
वक्फच्या काही भूखंडावर भूमाफियांनी बेकायदेशीर कब्जा केला असून त्यांच्या कारवाई करण्याची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांची मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे मागणी
दैनिक युवक आधार पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः वक्फच्या काही भूखंडावर भूमाफियांनी बेकायदेशीर कब्जा केला असून त्यांच्या कारवाई करण्याची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री माधुरी मिसाळ यांची भेट घेवून मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या मंत्री माधुरीताई मिसाळ (अर्बन डेव्हलपमेंट, ट्रान्सपोर्ट, सोशल जस्टिस, मेडिकल एज्युकेशन, अल्पसंख्यांक डेव्हलपमेंट आणि वक्फ ) यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेत त्यांना त्यांच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व अल्पसंख्यांक समाजातील विषयांवरती चर्चा केली .तसेच वक्फच्या काही भुखंडांवर भूमाफियांनी बेकायदेशीर कब्जा केला असून त्याची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.