ब्रेकिंग
आजपासून सुलेमान देवळा येथील ग्रामदैवत खंडोबा यात्रेस सुरुवात
0
0
3
4
8
4
आजपासून सुलेमान देवळा येथील ग्रामदैवत खंडोबा यात्रेस सुरुवात
सोमवारी हंगामाचे आयोजन
दैनिक युवक आधार
सुलेमान देवळा – शाहनवाज पठाण
- तालुक्यातील सुलेमान देवळा येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.परंपरेनुसार दरवर्षी भव्य दिव्य अशा यात्रा महोत्सवाचे आयोजन ग्रामस्थांमार्फत केले जाते. या यात्रेला मुंबई पनवेल सुरत व पंचक्रोशीतून भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात. मंदिरात व मंदिराच्या बाहेरही विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. यामुळे मंदिर परिसरात सुंदरतेची अधिकच भर पडली आहे.पैठण व वृद्धेश्र्वर वरून कावडीने पवित्र पाणी आणले जाते व गावात मिरवणूक काढली जाते, नंतर ते पाणी गावातील देवांना अर्पण केले जाते.संध्याकाळी खंडोबाची आरती होते,नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू असतो. गावांत पालखी मिरवणूक होते त्यामध्ये ढोल ताशा, डीजे, हलगी पथक, बँड यांचा समावेश असतो.सोमवारी दुपारनंतर कुस्त्यांचा हंगामा भरवला जाणार आहे. तालुक्यासह इतर ठिकानहुन मल्ल येत असतात. यात्रेमुळे बाहेर गावी गेलेले लोकही मोठ्या प्रमाणात गावी उत्सहाने येतात. दोन दिवस लोकं गुण्या गोविंदाने कार्यक्रमाचा आनंद घेतात. आज आणि उद्या होणाऱ्या यात्रोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रा कमिटी सह गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
0
0
3
4
8
4



