Breaking
ब्रेकिंग

डॉ.नं. मा. जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळे तर्फे जागतिक महिला दिन साजरा 

0 0 3 4 8 4

डॉ.नं. मा. जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळे तर्फे जागतिक महिला दिन साजरा 

 

पनवेल प्रतिनिधी

 

८ मार्च जागतिक महिला दिन सर्व जगभर महिलांचा सन्मान करून साजरा केला जातो.

डॉ.नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळेत अभिनव पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला गेला. पनवेल परिसरातील स्वतःचा व्यवसाय व कार्यक्षेत्रात आघाडीच्या भूमिका निभावणाऱ्या व समाजातील उपेक्षित घटक म्हणून दुर्लक्षित केलेल्या विशेष शाळेला मदत करणाऱ्या पाच प्रतिभा संपन्न महिलांचा सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यामध्ये विद्यार्थ्यांच्या पुनर्वसना करिता सातत्याने सहकार्य करणाऱ्या डॉ. समिधा गांधी,शाळेच्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक यांना प्रोत्साहन देणाऱ्या सौ.सलमा खान , विद्यार्थ्यांसाठी सातत्याने उपक्रम राबविणाऱ्या इनरव्हील क्लबच्या डॉ. वीणा मनोहर मॅडम, विद्यार्थ्यांना शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळेस वैयक्तिक व रोटरी क्लबच्या मार्फ़त खाऊ वाट्प करणाऱ्या दीपा पंजाबी मॅडम, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी शिबीर व कार्यशाळा यांना सहकार्य करणाऱ्या लायन्स क्लबच्या चंद्रा बोरा मॅडम, या कर्तबगार महिलांचा त्यांच्या कार्यस्थळी जाऊन त्या करत असलेल्या कार्यासाठी तसेच विशेष शाळेसाठी करत असलेल्या मदतीसाठी कृतज्ञतेच्या भावनेतून शाळेच्या विद्यार्थिनी व महिला कर्मचारी यांनी डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन तर्फे महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

युवक आधार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 4 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे