डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
दैनिक युवक आधार – सोनहिरा मित्र मंडळ सीबीडी नवी मुंबई यांच्या वतीने भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंती निमित्ताने रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सोनहिरा मित्र मंडळाचे अध्यक्ष व भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल नवी मुंबई संचालक मा. डॉ. विलासराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गेली वीस वर्षे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाचे महत्त्व आणि आरोग्य विषयी जनजागृती करण्यासाठी रन फॉर एज्युकेशन ही संकल्पना घेऊन स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धा पाच गटात घेण्यात आली आणि या स्पर्धेत एकूण 5650 स्पर्धकांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे उद्घाटन भारताचे माजी क्रिकेटपटू माननीय जतिन परांजपे व सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई विश्वस्त माननीय राजाराम देशमुख साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .सर्व विजेत्या स्पर्धकांचा सत्कार आणि पारितोषिक वितरण वरील मान्यवरांच्या हस्ते व डॉ. विलासराव कदम सर यांच्या हस्ते करण्यात आला. पुरुष खुला गटामध्ये प्रथम क्रमांक श्री निलेश हारसेकर , रोख पंचवीस हजार रुपये, महिला गटामध्ये कुमारी साक्षी संजय जड्याळ प्रथम क्रमांक रोख पंधरा हजार रुपये, 19 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक ,प्रणव संतोष शिणगारे, रोख पंधरा हजार रुपये, 14 वर्षाखालील मुले, प्रथम क्रमांक संकेत सुभाष नांगरे सात रुपये, 14 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक अबोली नंदकुमार वास्के यांनी उल्लेखनीय यश मिळवले.प्रत्येक गटातून चार क्रमांक होते. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी खारघर व सीबीडी वाहतूक पोलिसांचे अनमोल सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलातील सर्व सेवकांचे विशेष योगदान लाभले*.



