ब्रेकिंग
गिरगावच्या सुप्रसिद्ध चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलचा शानदार प्रवेशोत्सव.

0
0
3
4
8
4
गिरगावच्या सुप्रसिद्ध चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलचा शानदार प्रवेशोत्सव.
दैनिक युवक आधार
16जुन 2025 या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत ढोल ताशांच्या गजरात व औक्षण करून करण्यात आले.
प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास गुलाब पुष्प देण्यात आले.
या दिवशी मुंबई परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती तरीही विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री किशोर रांगणेकर सर व सचिव डॉक्टर गुरुनाथ पंडित सर यांनी समाधान व्यक्त केले.
शाळेच्या प्रवेशद्वारावरच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संचिता गावडे ,पर्यवेक्षक श्री. संतोष मांजरेकर,सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
0
0
3
4
8
4



