Breaking
ब्रेकिंग

बोकडविरा गावात अखंड हरिनाम सोहळा-2025 चा शुभारंभ

0 0 3 4 8 4

     बोकडविरा गावात अखंड हरिनाम सोहळा-2025 चा शुभारंभ

दैनिक युवक आधार/ महाराष्ट्र प्रतींनिधी , प्रदीप पाटील 

प.पू.सद्गुरू वै.ह.भ.प.वामनबाबा (तळोजे),अप्पा माऊली (पनवेल),हिरजीबाबा (वाघिवली), विश्वनाथबाबा (बेलापुर),श्री जीवनमुक्तस्वामी(उरण),गोपाळबाबा (वहाळ)व अहिल्याबाई यांच्या कृपाशिर्वादाने,ग्रामस्थ मंडळ बोकडविरा,व संततुकोबाराय गाथा (बाळक्रीडा) संगीत पारायण मंडळ बोकडविरा आयोजित अखंड हरिनाम सोहळा 2025 चा शुभारंभ दि.19 जानेवारी 2025 रोजी टाळ मृदुंगच्या गजरात मोठया उत्साहात करण्यात आला.

गावच्या सरपंच सौ.अर्पणा पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाच्या मूर्तीचे पूजन करून व उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील,समवेत ध्रुव पाटील व गौरव पाटील.यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सूर्यकांत पाटीलयांच्या हस्ते कलश पूजन, रमेश पाटील यांच्या हस्ते वीणा पूजन,ह.भ.प.गणेश ठाकुर यांच्या हस्ते ध्वजपूजन,कृष्णकुमार पाटील यांच्या हस्ते मृदुंगपूजन,ग्रंथपूजनसौ.हेमलता पाटीलव सौ.मानसी पाटील यांच्या हास्ते करण्यात येऊन हरिनाम सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.तर गाथेच्या सांगतेचे पूजन सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी पहाटे 05 वाजता काकड आरतीने या हरिनाम सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला असून सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी दीपोत्सव व पालकी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गावातून या पालखि दिंडीची मिरवणूक काढण्यात आली समस्त ग्रामस्थांनी या सोहळ्यात सहभाग घेतला ,दैदिन काकड आरती,प्रवचन,ग्रंथवाचन,,गाथा पारायण,जागर-भजन कीर्तन, हरीपाठ आणि मंगळवारदि.21 रोजी सकाळी 10 ते 12 वाजता ह.भ.प. मनोज महाराज ठाकुर (बेलपडा)यांच्या कार्ल्याच्या कीर्तनाने या हरिनाम सोहळ्याची सांगताकरण्यात आली पंचक्रोशिंतील भाविकांनी या हरिनाम सोहळ्यात मोठया प्रमाणात सहभाग घेतला

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

युवक आधार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 4 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे