आनंदीबाई प्रधान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे निसर्ग पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन

आनंदीबाई प्रधान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे निसर्ग पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन
नागोठणे : महेंद्र माने दि.17 जानेवारी 2025 — येथील को.ए.सो. च्या बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलनातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयच्या रसायनशास्त्र विभागातर्फे निसर्ग व त्यामागील विज्ञान दर्शवणारे निसर्ग चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या निसर्ग चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आपल्या मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ दिनेश भगत यांनी या वैज्ञानिक प्रदर्शनाचे महत्त्व विषद करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी को.ए. सो. संस्थेचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी डॉ. संदेश गुरव, रसायनशास्त्र विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, डॉ.विलास जाधवर,प्रा.जयेश पाटील,डॉ.स्मिता मोरबाळे, डॉ.मनोहर शिरसाठ, डॉ. राणी ठाकरे,प्रा.तृप्ती बोरकर,प्रा.चैत्राली पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. या प्रदर्शनात एफ.वाय.बी.एस्सी.च्या 50 विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पोस्टर्स प्रदर्शनाचे परीक्षण प्रा.प्राची दांडेकर, प्रा.तृप्ती बोरकर व प्रा.प्रतीक्षा म्हात्रे यांनी केले.सदर प्रदर्शन यशस्वी करण्याकरीता प्रा.डॉ. स्मिता चौधरी,प्रा.आक्रोश पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. या प्रदर्शनाला भेटी दिलेल्या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे चांगले अभिप्राय नोंदवले.



