Breaking
ब्रेकिंग

समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; मुकुंद शंकर कांबळे यांना ‘भारत सेवा पुरस्कार २०२६

0 0 3 5 3 6

समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; मुकुंद शंकर कांबळे यांना ‘भारत सेवा पुरस्कार २०२६

 

संपादक संतोष आमले
पनवेल : समाजसेवा, सामाजिक जनजागृती आणि समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुकुंद शंकर कांबळे यांना ‘भारत सेवा पुरस्कार – Exclusive National Award 2026’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘भारत सेवा पुरस्कार २०२६’च्या माध्यमातून समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्यात येत आहे. Service, Nation & Humanity या भावनेला केंद्रस्थानी ठेवून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा या पुरस्काराचा उद्देश असल्याचे पुरस्काराच्या प्रसिद्धीपत्रकावर नमूद आहे.
कांबळे यांना पुरस्काराचे प्रशस्तीपत्रक तसेच सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देणाऱ्या कांबळे यांच्या कार्याची या पुरस्काराच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याचे मानले जात आहे.
या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मुकुंद शंकर कांबळे यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

युवक आधार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 5 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे