Breaking
ब्रेकिंग

गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केले 47 जणांचे हरविलेले मोबाईल फोन परत

0 0 3 4 8 4

गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केले 47 जणांचे हरविलेले मोबाईल फोन परत

दैनिक युवक आधार

पनवेल, दि.6 (संजय कदम) ः पनवेल शहरासह खांदेश्‍वर पोलीस ठाणे हद्द, कामोठे पोलीस ठाणे हद्द, उरण पोलीस ठाणे, न्हावा शेवा पोलीस ठाणे हद्द परिसरात 47 जणांचे महागडे मोबाईल हरविले होते. त्याचा कसून शोध घेत सदर मोबाईल आज त्यांना परत करण्यात आले.
गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वपोनि उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने या संदर्भात विशेष मोहिम राबवून वेगवेगळ्या ठिकाणी हरविलेले अशा प्रकारचे 47 मोबाईल यांचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेवून ते आज गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या कार्यालयात संबंधित मालकांची ओळख पटवून त्यांना ते परत करण्यात आले. यावेळी अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहून त्यांनी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे विशेष आभार मानले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

युवक आधार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 4 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे