मोहपाडा ग्रामपंचायतीत सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी
मोहपाडा ग्रामपंचायतीत सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी
मोहपाडा ग्रामपंचायतीत सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी
दैनिक युवक आधार
रसायनी आनंद पवार:
स्री चळवळीच्या उद्धारकरत्याऀ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा १९४ वा जयंती उत्सव
मोहोपाडा-वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोहोपाडा-वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. उमाताई संदीप मुंढे यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीपशेठ मुंढे, ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील
ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्हातील नायगाव ह्या ग्रामीण भागात ०३ जानेवारी १८३१ मध्ये झाला.त्यांचा सन्मान व त्यांनी केलेले उत्तुंग कार्य जिवंत ठेवण्यासाठी दरवर्षी ०३जानेवारी हा जन्मदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. स्त्रीमुक्ती चळवळीत अग्रेसर असलेल्या सावित्रीमाई फुले ह्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. सावित्रीमाई फुले यांनी महिलांसाठी प्रदीर्घ लढा दिला.आणि महिलांची स्थिती सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले. सावित्रीमाई फुले यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला पूर्वीच्या काळी दलितांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते या सर्व वाईट गोष्टी विरुद्ध त्यांनी लढा दिला.आणि आपले शिक्षण चालू ठेवले त्यांना समाजात अस्पृश्यतेचा प्रचंड सामना करावा लागला पण त्यांनी कधीच हार मानले नाही.त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले.अहमदनगर व पुणे या मोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी आपले शिक्षण पार पाडले.सावित्रीमाई फुले यांचा विवाह वयाच्या ०९ व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला.महात्मा ज्योतिबा फुले हे १३ वर्षाचे होते. सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत १८४८ मध्ये भारतातील पहिली महिलासांठी शाळा सुरू केली आजच्या पिढीला मुलगी शिकली आणि प्रगती झाली हे सर्व ज्ञानज्योती क्रांतीज्योती माता सावित्रीमाई फुले यांच्या संकल्पनेतूनच झाली असल्याची प्रतिक्रिया सरपंच उभा मुंढे यांनी यावेळी दिली. अशा या महान ज्ञानज्योती क्रांतीज्योती माता सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितीतांनी अभिवादन केले



