आस्था इंस्टीट्यूट ऑफ सोसायटी मॅनेजमेंट आणि ट्रेनिंग ही संस्था गृहनिर्माण सोसायटी व्यवस्थापन प्रशिक्षणात अग्रस्थानी

आस्था इंस्टीट्यूट ऑफ सोसायटी मॅनेजमेंट आणि ट्रेनिंग ही संस्था गृहनिर्माण सोसायटी व्यवस्थापन प्रशिक्षणात अग्रस्थानी
दैनिक युवक आधार
मुकुंद कांबळे
सह संपादक
गृहनिर्माण सोसायटी व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या क्षेत्रात एक अग्रगण्य नाव बनलेली आस्था संस्था विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श व्यासपीठ ठरली आहे. 2017 पासून कार्यरत असलेल्या या संस्थेने हजारो विद्यार्थ्यांना GDC&A (Governments Diploma in Co-operation and Accountancy) आणि CHM (Co-operative Housing Management) अभ्यासक्रमांद्वारे प्रशिक्षित केले आहे.
आस्था संस्थेच्या विशेष प्रशिक्षण पद्धतीमुळे मे 2024 मध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले, आणि बहुतेक विद्यार्थ्यांनी उच्च गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली, ज्यामुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रतिमा अधिकच बळकट झाली आहे.
संस्थेची खास वैशिष्ट्येः
ऑनलाइन प्रशिक्षणः संपूर्ण महाराष्ट्रभर ऑनलाइन वर्ग उपलब्ध करून देत. संस्था विद्यार्थ्यांना घरबसल्या सहज प्रशिक्षण देते.
व्यावसायिक ज्ञानः विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव व ज्ञान दिले जाते, ज्यामुळे ते गृहनिर्माण सोसायटी
व्यवस्थापन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.
रोजगार Placement सेवाः प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संस्थेकडून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
नवीन बॅचची घोषणाः
आस्था संस्थेची नवीन GDC&A बॅच 5 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे. प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर उत्सुकता दिसून येत असून, संस्थेने इच्छुक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
संपर्कासाठीः
ज्यांना अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती हवी आहे. त्यांनी संस्थेशी त्वरित संपर्क साधावा.
आस्था संस्था विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश आणि व्यावसायिक स्थैर्य यासाठी एक आदर्श पर्याय देत, गृहनिर्माण सोसायटी व्यवस्थापन क्षेत्रात एक नवा अध्याय लिहित आहे.



