Breaking
ब्रेकिंग

वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने श्रीवर्धन तालुक्यात हाहाकार — शेतकरी हवालदिल

वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने श्रीवर्धन तालुक्यात हाहाकार — शेतकरी हवालदिल

0 0 3 4 8 4

वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने श्रीवर्धन तालुक्यात हाहाकार — शेतकरी हवालदिल

 

दैनिक युवक आधार

श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी -अनिकेत मोहित

 

दि. २१ ऑक्टोबर

आज सकाळपासून हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार श्रीवर्धन तालुक्यात वादळी वारे, ढगांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचे आगमन झाले. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात नुकतीच कापणीला आलेली भातशेती पूर्णपणे भिजली असून काही ठिकाणी उभी पिके जमिनीसकट पडली आहेत.

 

शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने तयार केलेली पिके आता पाण्याखाली गेल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे. आधीच पावसाच्या अनिश्चिततेने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाने आर्थिक फटका बसला आहे. काही ठिकाणी शेतात साचलेले पाणी ओसरण्यास वेळ लागणार असल्याने पिकांच्या पूर्ण नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे.

 

स्थानिक शेतकरी वर्गाने प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. हवामान विभागाकडून पुढील २४ तासांतही अशाच प्रकारच्या पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

श्रीवर्धन परिसरात या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कष्टाचे पाणी केले आहे.

 

5/5 - (1 vote)

युवक आधार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 4 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे