Breaking
ब्रेकिंग

यू अँड आय एंटरटेनमेंट प्रस्तुत मिस नवी मुंबई ब्युटी पेजंट सीझन 14 चे टॉप 13 फायनलिस्ट्स विजेतेपदासाठी सज्ज!

यू अँड आय एंटरटेनमेंट प्रस्तुत मिस नवी मुंबई ब्युटी पेजंट सीझन 14 चे टॉप 13 फायनलिस्ट्स विजेतेपदासाठी सज्ज!

0 0 3 4 8 4

यू अँड आय एंटरटेनमेंट प्रस्तुत मिस नवी मुंबई ब्युटी पेजंट सीझन 14 चे टॉप 13 फायनलिस्ट्स विजेतेपदासाठी सज्ज!

दैनिक युवक आधार (नवी मुंबई) – मिस नवी मुंबई सौंदर्य स्पर्धेच्या चौदाव्या पर्वाची सविस्तर माहिती देण्याकरिता पत्रकार परिषद सोमवारी आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये तेरा सौंदर्यवतींची अधिकृत घोषणा करण्यात आली. फोर पॉईंट्स बाय शेरटन, वाशी येथे ८ मार्च २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या अंतिम सामन्यात हा प्रतिष्ठित किताब जिंकण्यासाठी त्या सज्ज आहेत. स्पर्धेचे आयोजन यू अँड आय एंटरटेनमेंट द्वारे केले जाते आणि यंदाच्या सर्व तेरा सौंदर्यवती आपले सौंदर्य, प्रतिभा आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या स्पर्धेत भाग घेत आहेत.

 

शेकडोच्या वर प्राथमिक फेरीत सहभाग झालेल्या स्पर्धकांपैकी पुढील तेरा स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचल्या आहे. त्या पुढील प्रमाणे आहेत – अदिती तांबे, अवनी आचार्य, भावना सिंग, काजल पवार, करिश्मा कदम, काव्या बाली, निशिता ताहिलरामानी, रुपवर्धिनी सस्ते, साक्षी चुरी, सारा इम्तियाज, शुभ्रिधी पटेरिया, विनीत कौर आणि वृषाली भगत.

या प्रतिभावान स्पर्धक पारंपरिक वेशभूषा, वेस्टर्न वेअर आणि ईव्हनिंग गाऊन राऊंडमध्ये आपली चमक दाखवतील आणि मिस नवी मुंबई २०२५ चे विजेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील.

 

हॉटेल फोर पॉइंट्स बाय शेरेटन –या सौंदर्य स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून

हॉटेल फोर पॉइंट्स बाय शेरेटन गेल्या ८ वर्षांपासून या स्पर्धेशी जोडले आहे, यंदाही अधिकृत स्थळ प्रायोजक म्हणून सहकार्य करत आहे. हॉटेल मॅनेजर श्री. किरण मुनिराज यांनी या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले,

“मिस नवी मुंबई ब्युटी पेजंटला समर्थन देणे ही आमच्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या प्रतिष्ठित स्पर्धेचा भाग आहोत आणि महिलादिनाच्या निमित्ताने होणाऱ्या ग्रँड फिनालेसाठी आम्ही उत्सुक आहोत.”

 

फ्रेंच एसेंस – अधिकृत फ्रेगरन्स पार्टनर

 

यंदाच्या स्पर्धेला फ्रेंच एसेंस हा प्रीमियम परफ्युम ब्रँड ‘पावर्ड बाय’ म्हणून सहकार्य करत आहे. आपल्या अनोख्या आणि मोहक सुगंधांनी हा ब्रँड मिस नवी मुंबई स्पर्धेच्या भव्यतेत अधिक रंगत आणत आहे.

 

या भव्य सौंदर्य स्पर्धेचे आयोजक यू अँड आय एंटरटेनमेंट चे संचालक हरमीत सिंह आणि मनमीत सिंह यांनी यंदाच्या स्पर्धेबद्दल उत्साह व्यक्त करत सांगितले,

“आम्ही यावर्षीच्या गुणी आणि आत्मविश्वासाने भरलेल्या फायनलिस्ट्सना सादर करताना खूप आनंदी आहोत. स्पर्धा अत्यंत रोमांचक असणार आहे आणि आम्हाला फिनालेमध्ये या स्पर्धकांनी आपली प्रतिभा आणि व्यक्तिमत्त्व सादर करताना पाहायला फार उत्सुकता आहे.”

 

मिस नवी मुंबई ही सौंदर्य स्पर्धा आता एक प्रतिष्ठित स्पर्धा बनली आहे, जी केवळ सौंदर्याचाच नव्हे तर बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाचाही गौरव करते. ८ मार्च २०२५ रोजी होणारा ग्रँड फिनाले हा एक भव्य सोहळा असेल, जिथे स्पर्धक पारंपरिक वेशभूषा, वेस्टर्न वेअर आणि ईव्हनिंग गाऊन राऊंडमध्ये आपली चमक दाखवतील आणि नवी मुंबईच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करतील.

 

या पत्रकार परिषदेस व्हीएसएन फिल्म प्रोडक्शन्सचे निर्माता संदीप नागराले विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

 

 

 

यू अँड आय एंटरटेनमेंट विषयी

 

यू अँड आय एंटरटेनमेंट ही एक आघाडीची एंटरटेनमेंट कंपनी आहे, जी उच्च स्तरावरील सौंदर्य स्पर्धा आणि भव्य इव्हेंट्सचे आयोजन करते. महिलांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही कंपनी इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये नवे मानदंड स्थापित करत आहे.

 

हॉटेल फोर पॉइंट्स बाय शेरेटन विषयी

 

हॉटेल फोर पॉइंट्स बाय शेरेटन हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा हॉटेल ब्रँड आहे, जो उत्कृष्ट आतिथ्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या 8 वर्षांपासून हा ब्रँड मिस नवी मुंबई ब्युटी पेजंटशी जोडला गेला असून, स्पर्धक आणि पाहुण्यांना अविस्मरणीय अनुभव देण्याचे कार्य तो सातत्याने करीत आहे.

 

फ्रेंच एसेंस विषयी

फ्रेंच एसेंस हा एक प्रीमियम परफ्युम ब्रँड आहे, जो आपल्या आकर्षक आणि अद्वितीय सुगंधांसाठी प्रसिद्ध आहे. मिस नवी मुंबईचा अधिकृत फ्रेगरन्स पार्टनर म्हणून, हा ब्रँड या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेत एक वेगळी ओळख निर्माण करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

युवक आधार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 4 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे