स्व.श्रीमती जानकीदेवी सानप सार्वजनिक वाचनालय सावरगाव घाट येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रम संपन्न
स्व.श्रीमती जानकीदेवी सानप सार्वजनिक वाचनालय सावरगाव घाट येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रम संपन्न.
स्व.श्रीमती जानकीदेवी सानप सार्वजनिक वाचनालय सावरगाव घाट येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रम संपन्न.
दैनिक युवक आधार
पाटोदा (प्रतिनिधी) :
– वाचन संकल्प महाराष्ट्राचा या शासनाची वाचन चळवळ अधिक प्रभावीपणे गतिमान करण्यासाठी सरकारने या अभियानाद्वारे राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय यांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्या संबंधी महाराष्ट्र शासन परीपत्रानुसार वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी शासनाच्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमा अंतर्गत स्व.श्रीमती जानकीदेवी सानप सार्वजनिक वाचनालय,सावरगाव (घाट) ता.पाटोदा येथे सार्वजनिक वाचनालयानी वाचन कौशल्य कार्यशाळा व ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते. या वेळी ग्रंथालयात शालेय विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांनी आपल्या आवडीनुसार निवडलेल्या पुस्तकाचे सामुहिक वाचन कार्यक्रमाचे व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. दिनांक ३० व ३१ डिसेंबर या दोन दिवस याचा असंख्य वाचक व विद्यार्थ्यांनी यांनी लाभ घेतला. या वेळी विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनीसह शालेय शिक्षक, ग्रंथालयाचे कर्मचारी शेख हुमेरा, शेखर वाल्हेकर सह अनिकेत सानप, ब्रम्हदेव सानप, हनुमंत खाडे, सोमनाथ वाल्हेकर यांच्या सह असंख्य मान्यवर, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, वाचक नागरिक यांनी ग्रंथप्रदर्शनास भेट देऊन वाचन केले.



