Breaking
ब्रेकिंग

हनुमान मंदिर येथे श्रीमत् भागवत कथासार कार्यक्रम संपन्न

0 0 3 4 8 4

हनुमान मंदिर येथे श्रीमत् भागवत कथासार कार्यक्रम संपन्न

दैनिक युवक आधार / नवीन पनवेल श्रीमत् भागवत कथेचा सप्ताह आपण भक्तिभावाने साजरा करतो. या सर्व कथांचे सार आपल्या जीवनात कसे आणावे, आपले जीवन कसे आनंदी करावे ह्या साठी “श्रीमत् भागवत कथासार” हा कार्यक्रम शनिवार 4 जानेवारी 2025, सां 4 – 6 वाजता हनुमान मंदिर, नारायण नगर, पोदी नं 3, से 16, नवीन पनवेल येथे आयोजीत करण्यात आला होता.

देशविदेशातील ख्यातनाम कथाकार श्री ज्ञानेश्वरदादा बर्वे व सौ भक्तीताई बर्वे, वारजे, पुणे यांनी श्रीमत् भागवत कथासार या द्वारे सर्वांना मंत्रमुग्ध केले. बीके तारा दिदी, ब्रह्मा कुमारिज पनवेल यांनी आशिर्वाचन दिले व सर्व संस्थांच्या अध्यक्षांचा सत्कार केला. प्रसिद्ध स्त्रीरोग, कॅन्सर, गर्भ संस्कार तज्ञ, नील हॉस्पिटल, डिएसआरएफ ट्रस्ट च्या डायरेक्टर बीके डॉ शुभदा नील यांनी अध्यातम्यातून आरोग्य ह्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. मा सौ चारुशीला घरत, मा उपमहापौर, अध्यक्ष जीएस फाउंडेशन यांनी सर्वांचे आभर मानले.

नगरसेवक ॲड वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, तेजस कांडपिळे, डॉ सेजल नील, मंगला गडमुळे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्वच्छंद सामाजिक विकास संस्था – नीता घातुकडे, आरोग्य सेवा समिती – गीता गुप्ता, सहयोग स्नेह सेवा संस्थान – संतोष बहान, मुक्ताबाई भजन मंडळ – अनिता भोर, सखी शारदा भजन मंडळ – प्रभा सिन्हा, श्री विठ्ठल रखुमाई चॅरिटेबल ट्रस्ट – धाऊ पाटील, जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी सदस्य – उमेश मोरे, वरील सर्व संस्थांच्या सहयोगाने कार्यक्रम सफल झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

युवक आधार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 4 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे