पनवेल तालुक्यातील आदिवासी, दलित वस्ती नागरी सोयी सुविधा पुरविण्याची शिवसेनेची ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी
पनवेल तालुक्यातील आदिवासी, दलित वस्ती नागरी सोयी सुविधा पुरविण्याची शिवसेनेची ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी
दैनिक युवक आधार – पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील आदिवासी, दलित वस्तीतील रस्ते गाव तलाव, प्राथमिक आरोग्य केंद्र, घनकचरा प्रकल्प, महिला शौचालय, शालेय इमारत यासह इतर नागरी सोयी सुविधा शासनाने पुरावाव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख भरत जाधव यांनी भेट घेवून निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात भरत जाधव यांनी म्हटले आहे की, पनवेल तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाने अनेक योजना मंजूर केलेल्या आहेत. त्यामध्ये दलित, आदिवासी वाड्या, वस्ती, रस्ते, आरोग्य केंद्र, शाळेची इमारत, घनकचरा प्रकल्प, महिला शौचालय इत्यादी सुविधा काही ठिकाणी उपलब्ध नाहीत. तरी महाराष्ट्र शासनाच्या योजना या विभागात राबवाव्यात यासाठी रायगड जिल्हा परिषदमधील अधिकार्यांना तशा सुचना व आदेश काढावेत अशी विनंती त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात ग्रामविकास अधिकारी जयकुमार गोरे यांनी सकारात्मक दृष्टीकोन देवून तातडीने उपाय योजना करण्याचे संबंधित अधिकार्यांना आदेश दिले आहेत.



