ब्रेकिंग
देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर आत्महत्याग्रस्त पैलवार कुटूंबाची घरी सांत्वनपर भेट.

0
0
3
4
8
4
देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर आत्महत्याग्रस्त पैलवार कुटूंबाची घरी सांत्वनपर भेट.
दैनिक युवक आधार नांदेड प्रतिनिधी चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर
नांदेड -: बिलोली तालुक्यातील मिनकी येथील शेतकरी कर्जबाजारास कंटाळून आत्महत्या मिनकी गावात काही दिवसापूर्वी घडलेल्या अत्यंत दुर्देवी घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून टाकले आहे. गावातील अल्पभुधारक शेतकरी पिता पुञांने कर्जबाजारास कंटाळून (राजेंद्र लक्ष्मन पैलवार वय वर्ष ४३, ओमकार राजेंद्र पैलवार वय वर्षे १६) या पिञा पुञांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद असून, या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आमदार जितेश अंतापूरकर यांनी मिनकी गावास भेट देत पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. कुटुंबीयांची भेट घेताना आ.जितेश अंतापूरकर यांनी त्यांना धीर देत या कठीण प्रसंगी त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.
0
0
3
4
8
4



