जागतिक महिला दिनानिमित्त मुलींचा लाटी काठी मर्दानगी खेळ

जागतिक महिला दिनानिमित्त मुलींचा लाटी काठी मर्दानगी खेळ
दैनिक युवक आधार
पनवेल प्रतिनिधी
शिव आधार सामाजिक सेवा संस्था सेक्टर 11 संचालित
शांतीदूत मर्दानी आखाडा खारघर
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 8मार्च 2025 रोजी
हिंडाल्को इंडस्ट्रीज प्रायव्हेट लि. तळोजा या कंपनी ने महिला आणि मुलींसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये महिला आणि मुलींसाठी हक्क आणि समानता याविषयी व्याख्यान ठेवले होते तसेच सायबर क्राईम विषयी जनजागृती, महिला सुरक्षा या विषयावर श्रीमती दिपाली पाटील मॅडम (पोलिस निरीक्षक सायबर सेल सर्कल 2 पनवेल) आणि कायदे याविषयी माहिती देण्यात आली यासाठी प्रमुख पाहुणे ऍड. सौ संतोषी चव्हाण मॅडम यांनी महिलांचे हक्क, कायदे सक्षमीकरण यावर माहिती दिली.
यावेळी *शिव आधार सामाजिक सेवा संस्था सेक्टर 11 संचलित शांतीदूत मर्दानी आखाडा खारघर* यांच्या लाठी काठी प्रशिक्षण वर्गातील मुलींना त्यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यामध्ये मुलींनी स्टेजवर प्रात्यक्षिक दाखवून सर्वाना मंत्रमुग्ध केले. त्याच्या बरोबर त्याच्या प्रशिक्षिका सौ अश्विनी घोरपडे मॅडम आणि सौ प्रतीक्षा कदम मॅडम यांनी मोलाचे योगदान दिले त्यांनीही प्रात्यक्षिक सादर केले..
हिंडाल्को कंपनी ने प्रशिक्षका सौ अश्विनी घोरपडे आणि सौ प्रतीक्षा कदम यांचा सत्कार केला.शिव आधार च्या या छोट्या रणरागिणी ना आमंत्रित करून त्याची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी दिली त्यांचा आत्मविश्वास कर्तृत्व दाखवण्याची संधी दिली व त्यासाठी वाव दिला त्यामुळे मुलींचा आत्मविश्वास द्विगुणित झाला कारण एवढ्या मोठ्या कंपनीत स्टेज परफॉर्मन्स करण्याची त्याची पहिलीच वेळ होती त्यासाठी हिंडाल्को कंपनीचे मनापासून आभार. आणि विशेष करून ऍड सौ संतोषी चव्हाण मॅडम यांचे आभार त्याच्यामुळे शांतीदूत मर्दानी आखाडा मधील मुलींना महिला दिना निमित्त आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली. या मध्ये ईश्वरी घोरपडे, कुंजिका अहिरे, शुभ्र शिरसकर, मनस्वी करपे, जिविका अहिरे, ईश्वरी शेडगे, तनिष्का पानमंद, कावेरी झगडे, अर्णव मोरे आणि ईशान (शंभू) घोरपडे या सर्व रणरागिणी आणि बाल मावळे यांनी उत्कृष्ट पद्धतीने शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर केले.



